Neelam Gorhe | गेल्या पाच वर्षात मी कधीही…भोंदू खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि मंत्री नीलम गोऱ्हे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आपल्यावर केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. गोऱ्हे म्हणाल्या, “माझ्या घरच्यांनी मला जे संस्कार दिले आहेत, त्याचे मी काटेकोर पालन करते. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही ढोंगी गुरू किंवा बुवांना भेटणे किंवा त्यांचे दर्शन घेणे माझ्या संस्कारात नाही. माझी अढळ श्रद्धा देवीदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर आहे.”
महिलांच्या लैंगिक शोषण आणि अत्याचाराच्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या भोंदू अशोक खरात प्रकरणाचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असून, राज्यभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात अनेक राजकीय नेते खरातच्या संपर्कात होते, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणात नवे वळण आले असून सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. देसाई यांच्या म्हणण्यानुसार, गोऱ्हे या अनेक वर्षांपासून अशोक खरातला ओळखतात आणि कोरोनापूर्वी त्यांनी त्याची भेट घेतली होती. तसेच खरातने त्यांचे भविष्य सांगितल्याचाही दावा करण्यात आला आहे.
आमदारकीसाठी गोऱ्हे या खरातल्या भेटल्या असा आरोप देसाई यांनी केला आहे.
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या आणि मंत्री नीलम गोऱ्हे यांनी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आपल्यावर केलेल्या आरोपांवर पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट भूमिका व्यक्त केली आहे. गोऱ्हे म्हणाल्या, “माझ्या घरच्यांनी मला जे संस्कार दिले आहेत, त्याचे मी काटेकोर पालन करते. गेल्या पाच वर्षांत कोणत्याही ढोंगी गुरू किंवा बुवांना भेटणे किंवा त्यांचे दर्शन घेणे माझ्या संस्कारात नाही. माझी अढळ श्रद्धा देवीदेवतांवर आणि अक्कलकोट स्वामी समर्थांवर आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “महिलांची प्रगती आणि सामाजिक न्याय यासाठी मी राजकारणात आले आहे. मी प्रबोधनकार हिंदुत्व मानते; त्यामुळे राजकीय पदे किंवा मंत्री पदे मिळवण्यासाठी कधीही कोणत्याही तांत्रिक गुरुची किंवा बुवाबाजीची आवश्यकता भासली नाही.” नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की, “नाशिकमधील एक्सप्रेस इन हॉटेलमध्ये मी अशोक खरात यांची सहा-सात वर्षांपूर्वी किंवा कधीही भेट घेतली असल्याची बातमी पूर्णपणे काल्पनिक आहे. अशी कोणतीही भेट झाली नाही, याचा मी निसंदिग्धपणे इंकार करते.” या वक्तव्यामुळे प्रकरणातील आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली असून राजकीय वर्तुळात चर्चेला नवे वळण मिळाले आहे

