AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या... एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर

मोठी बातमी! दुचाकीवरून आले अन् थेट गोळ्या… एकनाथ शिंदेंच्या पदाधिकाऱ्यावर जीवेघणा हल्ला, धक्कादायक व्हिडीओ समोर

| Updated on: Jun 09, 2026 | 12:22 PM
Share

श्रीरामपूर शहरात काल (दि. 8 मे) रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे.

श्रीरामपूर शहरात काल (दि. 8 मे) रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना नेते प्रशांत कहाणे यांच्यावर काही अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना समोर आली आहे. मात्र सुदैवाने गोळी लक्ष्यावर न लागल्याने प्रशांत कहाणे थोडक्यात बचावले असून मोठा अनर्थ टळला आहे.

ही घटना शहरातील गोंधवणी परिसरात रात्री सुमारे 11 वाजण्याच्या दरम्यान घडल्याची माहिती मिळत आहे. प्रशांत कहाणे हे त्यांच्या चारचाकी वाहनातून जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या वाहनाच्या दिशेने गोळीबार केला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गोळी वाहनाच्या काचेच्या आरपार झाली मात्र कहाणे सुरक्षित राहिले. हल्लेखोरांचा निशाणा थोडक्यात चुकल्याने मोठा अनर्थ टळला.

या घटनेनंतर श्रीरामपूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिसराची पाहणी केली. तसेच सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू करण्यात आला आहे.

Published on: Jun 09, 2026 12:19 PM

Follow Us
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन.

कॉकरोजांच्या निशाण्यावर धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी, थेट निमिषा प्रधान हिच्या कॉलेजपर्यंत पोहोचले आंदोलन

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर.

विद्यार्थ्यांचा संताप! ‘NEET For Sale’चे पोस्टर थेट FTII चेअरमन आर. माधवनच्या केबीनच्या दारावर