AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला... कोर्टात नेमका युक्तीवाद काय?

शिवसेना पक्ष, चिन्ह सुनावणीत मोठा ट्वीस्ट, आमदारांच्या अपात्रतेची वाट पाहयला… कोर्टात नेमका युक्तीवाद काय?

| Updated on: Aug 18, 2026 | 4:06 PM
Share

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, शिवसेनेकडे ५५ आमदार होते, त्यापैकी हळूहळू ३९ आमदार शिंदेंकडे गेले. सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडल्याचा आरोप करत, दहाव्या सूचीनुसार त्यांच्या कृतींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

शिवसेना पक्षचिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणी सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, मूळ शिवसेनेकडे ५५ आमदार होते. सरन्यायाधीशांनी आमदारांच्या संख्येबद्दल विचारले असता सिब्बल यांनी हे उत्तर दिले.

सिब्बल यांच्या युक्तिवादानुसार, अध्यक्षांनी, आयोगाने आमदारांच्या अपात्रतेच्या निर्णयाची वाट पाहायला हवी होती. सुरुवातीला १६ आमदार शिंदे गटात गेले आणि त्यानंतर आणखी आमदार सामील होऊन एकूण ३९ आमदार शिंदे यांच्याकडे गेले. पक्षाच्या नोटिसींना या आमदारांनी उत्तर दिले नाही, असा आरोप सिब्बल यांनी केला आहे. आमदार अपात्रता प्रकरण महत्त्वाचे असून त्यावर अनेक गोष्टी अवलंबून असल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. याशिवाय, सिब्बल यांनी विधानसभा अध्यक्षांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अध्यक्षांनी दहाव्या सूचीअंतर्गत असलेल्या आपल्या अधिकारक्षेत्राची मर्यादा ओलांडली असून, राजकीय पक्षाच्या नेतृत्वातील बदलांकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचा युक्तिवाद सिब्बल यांनी केला. यामुळे आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांनी घेतलेल्या निर्णयांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Published on: Aug 18, 2026 04:00 PM

Follow Us