मोर्चा पूर्वी ठाकरेंचं पहिलं एकत्र आंदोलन, सरकारच्या जीआरची होळी
सरकारच्या जीआरची होळी करत ठाकरेंच्या सेनेकडून आज आझाद मैदानावर आंदोलन करण्यात आलं.
हिंदी भाषेच्या सक्तीच्या मुद्द्यावर आज ठाकरेंच्या सेनेकडून मुंबईच्या आझाद मैदान परिसरात आंदोलन करण्यात येत आहे. सरकारच्या जीआरची होळी करत हे आंदोलन करण्यात येत आहे. त्यासाठी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने याठिकाणी दाखल झालेले आहेत.
राज्यात पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीची करण्यात येण्याबाबत नव्या शैक्षणिक धोरणात नियम काढण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट याबाबत आक्रमक झाला आहे. येत्या 5 जुलै रोजी देखील भव्य मोर्चा यासंदर्भात काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज ठाकरेंकडून हिंदी सक्तीच्या सरकारच्या प्रतीकात्मक जीआरची होळी करण्यात आली आहे. यात मनसे नेत्यांसह इतर घटक पक्षाच्या नेत्यांची देखील उपस्थिती होती.
Published on: Jun 29, 2025 03:35 PM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
