शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट? मध्यरात्री 1:15 वाजता पार पडलेल्या पक्षप्रवेशात…
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरमध्ये असल्याची चर्चा सुरू आहे. अशात काल रात्री उशिरा गंगुबाई शिंदे सभागृहात शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांचा शिंदे गटात पक्षप्रवेश पार पडला. रात्री तब्बल 1:15 पर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली. अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना थेट रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामुळे त्यांच्या जागी खासदार श्रीकांत शिंदे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. मंत्री भरत गोगावले आणि प्रताप सरनाईक यांनाही कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, “लोकं, नेते आणि पदाधिकारी एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास दाखवत आहेत. कार्यकर्ते दूरवरून आले होते. त्यामुळे कार्यक्रम रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्यात आला.” दरम्यान, शुभांगी पाटील यांची उपगट नेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. स्वतः श्रीकांत शिंदेंनी याची माहिती दिल्याचंदेखील सांगितलं जात आहे.
Published on: Jul 04, 2026 01:09 PM
शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याला पक्षाकडून मोठं गिफ्ट?
पर्यटनासाठी चालेले आहात? ही बातमी तुमच्यासाठीच, महाबळेश्वरमध्ये जमीन
Power Corrupts...; ठाकरेंची पोस्ट व्हायरल! साटम प्रकरणावर सरकारला घेरल
मुसळधार पावसाने अंधेरी ठप्प! वीरा देसाई रोडने घेतले नदीचे रूप