AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव...

मोठी घडमोड! ठाकरेंना धक्का देत शिंदे गटात प्रवेश करताच महिला पदाधिकाऱ्याचं मोठं विधान; थेट नाव…

| Updated on: Jul 04, 2026 | 11:54 AM
Share

शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी काल रात्री शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रातील हा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात मोठी चर्चा ठरत आहे. या सोहळ्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. उपस्थिांबाबतची माहिती स्वतः शुभांगी पाटील यांनीही दिली.

शिवसेना ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाच्या उपनेत्या शुभांगी पाटील यांनी काल रात्री शिवसेना शिंदे गटात अधिकृत प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रातील हा पक्षप्रवेश राजकीय वर्तुळात मोठी चर्चा ठरत आहे. या सोहळ्यावेळी खासदार श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, मंत्री प्रताप सरनाईक आणि मंत्री भरत गोगावले उपस्थित होते. उपस्थिांबाबतची माहिती स्वतः शुभांगी पाटील यांनीही दिली.

पक्षप्रवेशानंतर प्रतिक्रिया देताना शुभांगी पाटील यांनी मोठं विधान केलं. त्या म्हणाल्या, “पक्षातील कोणत्याही वरिष्ठाने मला थांब असं सांगितलं नाही. कोणाचाही फोन आला नाही. जवळपासच्या काही जणांनी कॉल केले त्यांची नाव मी थेट घेणार नाही मात्र त्यांनी फक्त पक्षप्रवेश करत आहात का, एवढंच विचारलं. बाकी काहीच नाही. माझ्यावर अनेक शिक्षकांच्या मागण्यांची, हक्काची जबाबदारी आहे. ती पूर्ण करण्यासाठी मी शिवसेनेत प्रवेश केला.”

गेल्या 10-12 वर्षांपासून शुभांगी पाटील या शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत आहेत. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी अनेक आंदोलने केली असून आझाद मैदानावर उपोषणही केलं होतं. त्यांच्या या निर्णयामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखी वाढल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

Published on: Jul 04, 2026 11:54 AM

Follow Us
भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान.

भाजपने दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची खरंच अट घातली? CM फडणवीसांचे नाव घेत बड्या नेत्याचे मोठे विधान

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी….

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात या लोकांच्या चुकीला नका देऊ माफी…

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट.

weather update : पाऊस आलारे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित.

सोनम वांगचुक यांच्या पाठिंब्यासाठी आता शेखर सुमन उतरले, म्हणाले जिंदा लाशों में से एक जीवित

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल.

तुकाराम मुंढे यांचा भाजपच्या बड्या नेत्याला दणका, बनावट गुटखा प्रकरणात जवळच्या नातेवाईकावर गुन्हा दाखल

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार.

T20 World Cup 2028 स्पर्धेसाठी 12 संघ ठरले, 8 संघ पात्रता फेरीतून ठरणार