VIDEO : Assembly Speaker Election | ‘सपाचे आमदार अबू आझमी, रईस शेख तटस्थ’

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी  यांना मतदान करण्याचा व्हीप काढलायं. तर या निवडणूकीमध्ये सपाचे आमदार अबू आझमी आणि  रईस शेख तटस्थ राहिले आहेत. त्यांनी आपले मत कोणालाही दिले नाहीये. 

शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

|

Jul 03, 2022 | 12:31 PM

राज्यात विशेष अधिवेशनाला सुरूवात झालीयं. विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी  शिवसेनेकडून व्हीप लागू करण्यात आले. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रतोद असलेल्या सुनील शिंदे यांनी एक व्हीप काढून शिवसेनेच्या सर्व आमदारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी  यांना मतदान करण्याचा व्हीप काढलायं. तर या निवडणूकीमध्ये सपाचे आमदार अबू आझमी आणि  रईस शेख तटस्थ राहिले आहेत. त्यांनी आपले मत कोणालाही दिले नाहीये. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण चांगलेच रंगात आल्याचे दिसते आहे. काल रात्री उशीरा गोव्यावरून बंडखोर आमदार मुंबईमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे गटाचे हे सर्व आमदार मुंबईतील एका हाॅटेलमध्ये वास्तव्यास आहेत.

 

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें