Special Report | युतीआधीच MNS-BJP कार्यकर्त्यांचा एकत्रित मोर्चा-tv9
एकीकडे मनसे-भाजप युतीच्या चर्चा होतायत. मनसे कार्यकर्ते मशिदींवरच्या भोंग्याविरोधान हनुमान चालीसा लावतायत. दुसरीकडे मंदिरांसाठी भाजपचे नेते मोफत लाडऊ स्पीकर वाटतायत. आणि त्यानंतर आता मनसे-भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित मोर्चाही काढलाय.
एकीकडे मनसे-भाजप युतीच्या चर्चा होतायत. मनसे कार्यकर्ते मशिदींवरच्या भोंग्याविरोधान हनुमान चालीसा लावतायत. दुसरीकडे मंदिरांसाठी भाजपचे नेते मोफत लाडऊ स्पीकर वाटतायत. आणि त्यानंतर आता मनसे-भाजप कार्यकर्त्यांनी एकत्रित मोर्चाही काढलाय. कल्याण ग्रामीण भागातल्या पाणी प्रश्नाबाबत मनसे आणि भाजप कार्यकर्त्यांनी कल्याण-डोंबिवलीच्या मुख्यालयावर मोर्चा काढला. मनसे-भाजपच्या या संयुक्त मोर्च्याचं मनसेकडून आमदार राजू पाटील आणि भाजपकडून आमदार रवींद्र चव्हाण नेतृत्व करत होते. मोर्चा नेल्यानंतर महापालिकेचे आयुक्तच उपस्थित नसल्यामुळे संतापही व्यक्त करण्यात आला. दाव्यानुसार कल्याणच्या ग्रामीण भागात रोज २०० टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय. त्यासाठी हा भाग दुष्काळी भाग म्हणून घोषित करण्याची मागणी आहे. एकीकडे भोंग्याविरोधात मनसे-भाजपची भूमिका परस्परांना पूरक वाटतेय. आणि दुसरीकडे पाण्यासारख्या मुलभूत मुद्द्यांवरुन दोन्ही पक्ष एकत्रित मोर्चे काढतायत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांत मविआ विरुद्ध मनसे-भाजप एकत्रित येण्याची दाट शक्यता आहे.
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

