Special Report | परवानगी घेऊनच भोंगे, नाही तर वर्षभर जेल !-tv9

मशिद असो की मंदिर, भोंग्यांसाठी परवानगी आवश्यक असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणतायत. मात्र त्यावेळी मशिदीवरील भोंगे बंद होणार नाही, हेही पांडेंनी सांगितलंय. तर 3 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे काढले नाही तर आम्ही हनुमान चालीसा लावणार, यावर मनसे ठाम आहे.

दादासाहेब कारंडे

|

Apr 18, 2022 | 9:58 PM

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे काढण्याचा इशारा दिला. आणि इकडे नाशिकच्या पोलीस आयुक्तांनी 4 महिने ते वर्षभरापर्यंतच्या तुरुंगवासाचा नियम आदेश पारित केला. म्हणजेच परवानगी न घेता, भोंगे लावले तर थेट जेल. सध्या मशिदीवरील अधिकृत भोंग्यांवरची 5 वेळची अजान बंद होणार नाही. 3 मे पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसाठी परवानगी घ्यावी लागेल. सर्व मशिदीवरील भोंग्यांना पोलीस परवानगी घेणं बंधनकारक आहे. भोंग्यांवर हनुमान चालीसा लावण्यासाठीही परवानगी आवश्यक आहे. परवानगी न घेतल्यास ‘3 मे’ नंतर कारवाई करुन भोंगे काढले जाणार. हनुमान चालीसा पठणासाठी अजानच्या 15 मिनिटं आधी परवानगी असेल मशिदीपासून 100 मीटर लांब अंतरावर हनुमान चालीसा पठण करता येणार. पोलिसांच्या आदेशाचं पालन न केल्यास 4 महिने ते 1 वर्षाच्या तुंरुगवासाची शिक्षा, असे फार्मान निघाले. मशिद असो की मंदिर, भोंग्यांसाठी परवानगी आवश्यक असं नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे म्हणतायत. मात्र त्यावेळी मशिदीवरील भोंगे बंद होणार नाही, हेही पांडेंनी सांगितलंय. तर 3 तारखेनंतर मशिदीवरील भोंगे काढले नाही तर आम्ही हनुमान चालीसा लावणार, यावर मनसे ठाम आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें