शाळेसाठी चिमुरडीचा थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन
गोंदिया जिल्ह्यातील भागी देवरीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील भूमी बंग नावाच्या विद्यार्थीनीने आपली शाळा सुरू करण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यानाच फोन लावला आहे.
गोंदिया जिल्ह्यातील भागी देवरीमधील जिल्हा परिषदेच्या शाळेतील भूमी बंग नावाच्या विद्यार्थीनीने आपली शाळा सुरू करण्यासाठी थेट जिल्हाधिकाऱ्यानाच फोन लावला आहे. भूमी बंग हिने जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलताना सांगितले की ऑनलाईन शाळा सुरू आहेत पण त्यातून नीटसं समजत नाही. त्यामुळे आपल्या परिसरातील इतर शाळा सुरू झाल्या आहेत त्यामुळे आमचीही शाळा सुरू करा अशी मागणी तिने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. त्यानंतर जिल्हाधि्काऱ्यांनीही तुमची शाळा लवकर चालू करण्याचा प्रयत्न करुन पुढील आठवड्यापासूनच शाळा सुरू करण्याचा शब्द दिला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या तब्बेतेची विचारपूसही भूमीने केली. जिल्हाधिकारी काही दिवसापूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या त्याबद्दल भूमीने त्यांना काळजी घेण्याचे सांगून आपली शाळा लवकर चालू करा असे सांगितले.
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

