Sudhir Mungantiwar | ठाकरे–फडणवीस गुप्त भेटीच्या चर्चांवर मुनगंटीवारांचे स्पष्टीकरण; म्हणाले, गुप्त बैठकीची गरज…
महाराष्ट्रातील विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मध्यरात्री झालेल्या कथित भेटीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. एका ट्विटच्या माध्यमातून ही माहिती समोर आली असून, ‘प्रबुद्ध भारत’ या मीडिया हाऊसने सूत्रांच्या आधारे ‘वर्षा’ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची भेट झाल्याचा दावा केला आहे. मात्र, या भेटीमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी या चर्चांवर प्रतिक्रिया देत स्पष्ट भूमिका मांडली आहे. मुनगंटीवार म्हणाले की, “देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे हे दोघेही आपल्या पक्षांचे सर्वोच्च नेते आहेत. अशा नेत्यांना गुप्तपणे बैठक घेण्याची काहीच गरज नाही. भेट घ्यायची असेल, तर ती छातीठोकपणे आणि उघडपणे घेतील.” ते पुढे म्हणाले की, “हे दोन्ही नेते पराक्रमी आहेत. त्यांना गुप्त बैठका घेण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारच्या अफवा पसरवून समाजात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये.”
या वक्तव्यानंतर कथित भेटीच्या चर्चांना वेगळं वळण मिळालं असून, विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published on: Apr 25, 2026 04:02 PM
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं