AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!

सुनेत्रा पवार यांना मुख्यमंत्रीपदाची संधी द्या, बड्या नेत्याच्या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ!

| Updated on: Jul 12, 2026 | 7:28 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉ. अभिजित मोरे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाबाबत मोठे विधान केले आहे. एकनाथ खडसे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभरात जोरदार चर्चेचे वारे वाहु लागेल.

अशात राष्ट्रवादीच्या डॉ. अभिजित मोरे यांनी सुनेत्रा पवार यांना राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची संधी देण्याची मागणी केली आहे. महायुतीमध्ये भाजप हा मोठा भाऊ असून पक्षाचे केंद्रीय नेतृत्व समजूतदार असल्यामुळे राष्ट्रवादीच्या मागणीचा सकारात्मक विचार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महायुतीमध्ये यापूर्वी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची संधी देण्यात आली होती. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर उर्वरित काळासाठी राष्ट्रवादीला संधी मिळावी, असे त्यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठी जबाबदारी मिळण्याच्या चर्चा सुरू असल्याने मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीकडे यावे, असेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री देत नवा आदर्श निर्माण करण्याची ही योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

Published on: Jul 12, 2026 07:28 PM

Follow Us