सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद अवैध? थेट नोटीस पाठवल्याने एकच खळबळ; राष्ट्रवादी पक्षातील संघर्ष चव्हाट्यावर?
राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षातील राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. पक्षातील जेष्ठ नेत्यांनी या पदाच्या वैधतेवर प्रश्न उपस्थित केल्याने राजकीय वातावरण तापले आहे.

यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी महत्त्वाची भूमिका घेतली आहे. त्यांनी आपल्या वकिलामार्फत पक्ष नेतृत्वाला नोटीस पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. या नोटीसमध्ये राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत काही मुद्दे उपस्थित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडींमुळे पक्षाच्या अंतर्गत राजकारणाला वेग आला असून आगामी काळात या प्रकरणावर मोठी चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, पक्षाकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
Published on: Jul 13, 2026 06:04 PM
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब