AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Super Fast News | अलर्ट! कोकणात पावसाचा इशारा

Super Fast News | अलर्ट! कोकणात पावसाचा इशारा

| Updated on: Mar 24, 2023 | 9:17 AM
Share

महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सांगलीत सुरूवात झाली. त्याची आज अंतिम फेरी रंगणार असून जी महिला कुस्तीपट्टू विजयी ठरेल तिला चांदीची गदा मिळणार आहे

सुपरफास्ट 50 न्यूज | राज्यात आजपासून पुन्हा एकदा अवकाळी पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मराठवाडा, उत्तर-मध्य महाराष्ट्र, सोलापूर, धुळे, नाशिक, नंदुरबार आणि विदर्भात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती विभागाने दिली आहे. तर पुढच्या 48 तास कोकणात पावसाचा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. आधीच अवकाळीमुळे शेतकरी त्रस्त झाला असतानाच आता पुन्हा एकदा पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर अवकाळी पावसामुळे फळ बागायतदारांचा मोठा नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. महिलांच्या पहिल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेला सांगलीत सुरूवात झाली. त्याची आज अंतिम फेरी रंगणार असून जी महिला कुस्तीपट्टू विजयी ठरेल तिला चांदीची गदा मिळणार आहे. दरम्यान पुणे आणि मुंबई या दोन शहरात दरम्यान थेट विमानसेवा सुरू होणार आहे. त्यामुळे प्रवास सुखकर होण्यास मदत होणार आहे. या विमानसेवेला 26 मार्चपासून सुरूवात होणार आहे. यासह ह्या राज्यातील इतर महत्वाच्या घडामोडींचा आढावा सुपरफास्ट 50 न्यूज मध्ये

Published on: Mar 24, 2023 09:17 AM