AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shiv Sena Symbol Dispute : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी, आतपर्यंत काय-काय झालं?

Shiv Sena Symbol Dispute : धनुष्यबाण कुणाचा? सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष-चिन्हाची आज सुनावणी, आतपर्यंत काय-काय झालं?

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Nov 12, 2025 | 11:54 AM
Share

सुप्रीम कोर्टात आज शिवसेना पक्ष, चिन्ह आणि आमदार अपात्रता प्रकरणांवर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी अपेक्षित आहे. या सुनावणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

आज सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्षाचे नाव, चिन्ह धनुष्यबाण आणि आमदार अपात्रता प्रकरणावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाचीही सुनावणी अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेनेचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह बहाल करण्याच्या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे.

तर ठाकरे गटाचा आरोप आहे की, निवडणूक आयोगाचा हा निर्णय असंविधानिक आणि पक्षपाती आहे. या प्रकरणात ठाकरे गटातर्फे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल युक्तिवाद करतील. यापूर्वी कोर्टाने आमदार अपात्रतेचा निर्णय घेण्याचे अधिकार विधानसभा अध्यक्षांना दिले होते. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटांच्या आमदारांना पात्र ठरवले होते. आता सुप्रीम कोर्टात पक्षचिन्हाच्या अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते सुप्रिया सुळे, अनिल देसाई, अनिल परब हे सुनावणीसाठी उपस्थित राहणार आहेत.

Published on: Nov 12, 2025 11:54 AM

Follow Us
Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले.

Manoj Jarange Patil : ‘माज आणि मस्ती असती, ती मस्ती इतकी भयानक असती..’ दिल्लीला रवाना होताना मनोज जरांगे पाटील गरजले

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून...

तेलाचे भाव भडकले, अमेरिकेचे इराणमधील 5 शहरांवर हल्ले, भारताला फटका, होर्मुज खाडीतून..

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?.

भाजपच्या बड्या नेत्याने रात्री उशिरा रुग्णालयात घेतली सोनम वांगचूक यांची भेट; काय घडलं?

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर...

Gold Price Today : टेन्शन टेन्शन.. सलग तिसऱ्या दिवशी सोन्याचे भाव चढेच; आज 10 ग्रॅमचा दर..

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली.

CJP Protest: तर हे कोणासोबतही होऊ शकतं…विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज, जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन भडकली