AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले

अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या आग प्रकरणावरून सुषमा अंधारेंनी संजय काटकरांना खडसावले

| Updated on: Aug 26, 2026 | 2:43 PM
Share

अमरावती: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. यावेळी चौकशी समितीचे प्रमुख आणि आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्याशी त्यांचा तीव्र शाब्दिक संवाद झाला. पाहणीनंतर अंधारे यांनी काटकर यांना वारंवार संपर्क साधत विलंबाबद्दल जाब विचारला. “दोन तासांपासून तेच कारण सांगत आहात. एवढा वेळ जर रुग्णांसाठी दिला […]

अमरावती: अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आग प्रकरणानंतर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रुग्णालयाला भेट देत पाहणी केली. यावेळी चौकशी समितीचे प्रमुख आणि आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्याशी त्यांचा तीव्र शाब्दिक संवाद झाला.

पाहणीनंतर अंधारे यांनी काटकर यांना वारंवार संपर्क साधत विलंबाबद्दल जाब विचारला. “दोन तासांपासून तेच कारण सांगत आहात. एवढा वेळ जर रुग्णांसाठी दिला असता, तर ही घटना घडली असती का?” असा सवाल करत त्यांनी अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

दरम्यान, आग लागण्याच्या घटनेची चौकशी सुरू असून आरोग्य विभागाने समिती नियुक्त केली आहे. या प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही सुषमा अंधारे यांनी केली.

Published on: Aug 26, 2026 02:43 PM

Follow Us