AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत? तपास सुरू

Mumbai | मुंबईच्या मढ किनाऱ्याजवळ संशयित जहाज!; कोणत्या देशाचे? काय आहे आत? तपास सुरू

| Updated on: Jul 08, 2026 | 10:34 AM
Share

मुंबईतील मनोरीनंतर आता मढ किनाऱ्याजवळही एक संशयित जहाज आढळल्याने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे जहाज मढ किनाऱ्यापासून सुमारे ७ ते ८ किलोमीटर अंतरावर समुद्रात उभे असल्याचे निदर्शनास आले आहे. घटनेची माहिती मिळताच भारतीय तटरक्षक दलाने (Indian Coast Guard) तातडीने तपास सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज नेमके कुठून आले, ते कोणत्या देशाचे आहे आणि त्यामध्ये कोणता माल किंवा साहित्य आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे या जहाजाबाबत विविध शक्यता तपासल्या जात असून, संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे.

दरम्यान, भारतीय तटरक्षक दल आणि स्थानिक पोलीस संयुक्तपणे या जहाजाची पाहणी आणि तपास करत आहेत. जहाज मढ किनाऱ्यापर्यंत कसे पोहोचले, त्याचा प्रवासमार्ग काय होता आणि त्यामागे कोणते कारण आहे, याचाही शोध घेतला जात आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने समुद्रकिनारी आणि आसपासच्या परिसरात सतर्कता वाढवण्यात आली असून, तपास पूर्ण होईपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. संबंधित यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, तपासानंतरच या जहाजाबाबत अधिकृत माहिती जाहीर केली जाणार आहे.

Published on: Jul 08, 2026 10:34 AM

Follow Us