AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tamilnadu Vidhansabha Elections Result | तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?

Tamilnadu Vidhansabha Elections Result | तामिळनाडूत विजय यांच्या नव्या पक्षाचा उदय होणार?

| Updated on: May 04, 2026 | 10:05 AM
Share

तमिळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली असून, देशभराचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये तमिळनाडूमध्ये चुरशीची तिहेरी लढत पाहायला मिळत आहे.

तमिळनाडूसह पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला आज सकाळी 8 वाजल्यापासून सुरुवात झाली असून, देशभराचे लक्ष या निकालांकडे लागले आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये तमिळनाडूमध्ये चुरशीची तिहेरी लढत पाहायला मिळत आहे. तमिळनाडूमध्ये सत्ताधारी डीएमकेसह काँग्रेस आघाडी सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत असताना एआयएडीएमके -भाजप आघाडी सत्तेत येण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, यंदा टीव्हीके या नव्या पक्षामुळे राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.
अभिनेता ते राजकारणी विजय यांच्या पक्षाने पहिल्याच निवडणुकीत दमदार कामगिरी करत सुरुवातीच्या कलांमध्ये सुमारे 93 जागांवर आघाडी घेतली आहे. तर डीएमके सुमारे 51 आणि एआयएडीएमके सुमारे 98 जागांवर आघाडीवर असल्याचे चित्र आहे.
तमिळनाडू विधानसभेच्या एकूण 234 जागांसाठी मतदान झाले असून, सत्तास्थापनेसाठी 118 जागांची आवश्यकता आहे. मुख्यमंत्री स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे.
दरम्यान, विजय यांनी 2024 मध्ये पक्षाची स्थापना करून पहिल्यांदाच निवडणूक लढवली असून, पेरांबूर आणि तिरुचिरापल्ली पूर्व या मतदारसंघांतून ते रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रवेशामुळे तमिळनाडूच्या राजकारणात नवा अध्याय सुरू झाल्याचे मानले जात आहे. सुरुवातीच्या कलांनंतर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, संभाव्य सत्तास्थापनेसाठी विविध पक्षांकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. अंतिम निकालासाठी पुढील काही तास महत्त्वाचे ठरणार आहेत.

 

Published on: May 04, 2026 10:05 AM
Follow Us