AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्वीट

टी-20 विश्वचषकात भारताच्या विजयानंतर मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्वीट

| Updated on: Mar 09, 2026 | 9:43 AM
Share

टीम इंडियाच्या टी-20 विश्वचषक विजयामुळे देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला असून फटाके फोडून आनंद साजरा केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी संघाचे अभिनंदन करत या ऐतिहासिक विजयाचे कौतुक केले. नाशिकसह अनेक शहरांमध्ये नागरिकांनी रस्त्यावर उतरून आनंद व्यक्त केला.

टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर टीम इंडियाने जो जिता वही सिकंदर हे सिद्ध केले आहे. लहानग्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच टीम इंडियाच्या या विजयाने आनंदी आहेत. आजच दिवाळी साजरी झाल्याची भावना क्रिकेटरसिकांनी व्यक्त केली. संपूर्ण राज्यभरात आणि देशभरात क्रिकेट चाहत्यांनी फटाके फोडून आणि आतषबाजी करत जल्लोष केला. हा टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय असून 2007, 2024 आणि 2026 मध्ये सलग तीन वेळेला टी-20 विश्वचषक जिंकून भारताने हॅट्रिक साधल्याचे म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करून या विजयाचे वर्णन “रोमांचकारी, चमकदार आणि आश्चर्यकारक, प्रचंड” असे केले. त्यांनी 2026 च्या आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषकातील ऐतिहासिक विजयाबद्दल टीम इंडियाचे अभिनंदन केले. खेळाडूंनी दाखवलेल्या असाधारण कौशल्य आणि दृढनिश्चयामुळे देशाला अभिमान वाटल्याचे फडणवीसांनी नमूद केले. सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाचे आणि संपूर्ण संघाच्या सांघिक खेळाचे त्यांनी कौतुक केले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनीही टीम इंडियाचे कौतुक करत अभिनंदन केले. नाशिकमध्येही या विजयाचा मोठा जल्लोष पाहायला मिळाला, जिथे पोलिसांनी गर्दी नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला.

Published on: Mar 09, 2026 09:43 AM
Follow Us