नाटक न करता राजीनामा द्यावा आणि…, देवेंद्र फडणवीसांना ठाकरे गटाच्या बड्या नेत्यानं डिवचलं
Arvind Sawant on Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली होती. तर नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
मला असं वाटतं ज्यांना राजीनामा द्यायचा आहे त्यांना नाटकं करण्याची गरज नसते. त्यांनी आपला राजीनामा द्यावा आणि शांत बसावं, असं म्हणत ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांना डिवचलं आहे. तर अरविंद सावंत पुढे असेही म्हणाले की, उगाच इकडे भेट तिकडे भेट.. याचा अर्थ कुणीतरी म्हणावं.. तुम्ही आपला राजीनामा मागे घ्या, असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना खोचक टोलाही लगावला आहे. दरम्यान, संजय राऊत ज्या प्रमाणे काल म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा म्हणजे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदी योगीनाथ यांनी आपला राजीनामा द्यावा असा एकप्रकारे संकेत आहे, असा याचा अर्थ आहे, असेही अरविंद सावंत म्हणाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राज्य मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केली आहे. इतकंच नाहीतर फडणवीस यांनी असेही म्हटले की, नेता म्हणून महाराष्ट्रातील भाजपच्या पराभवाची सर्व जबाबदारी माझी असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
!['वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ? 'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/zeeshan-.jpg?w=280&ar=16:9)
'वांद्रे आता सुरक्षित नाही, '...काय म्हणाले झिशान सिद्दीकी ?
!['येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ 'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/chhagan-bhujbal-photo.jpg?w=280&ar=16:9)
'येवला सोडून मी कुठेही....,' काय म्हणाले छगन भुजबळ
![गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड... गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/crime-2.jpg?w=280&ar=16:9)
गुन्हे करून आरोपींचं देवदर्शन? घुले-आंधळे गुजरात तर वाल्मिक कराड...
![बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/BEED-ASHTI-.jpg?w=280&ar=16:9)
बीड पुन्हा हादरलं... लोखंडी रॉड-धारदार शस्त्र; दोन सख्या भावांची हत्या
![सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं सैफवर चाकूचे वार, रक्तबंबाळ, लिलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यानं सांगितलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/auto-driver.jpg?w=280&ar=16:9)