AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन

मोठी खळबळ!दादरमध्य ठाकरेंच्या शिवसेनेचेही तीव्र आंदोलन, भांडी वाजवत अनोखं प्रदर्शन

| Updated on: Jun 03, 2026 | 5:51 PM
Share

महागाईच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून याविरोधात ठाकरेसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. दादरमधील शाखा क्रमांक 191 समोर आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं.

महागाईच्या वाढत्या झळांमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असून याविरोधात ठाकरेसेनेने मुंबईत जोरदार आंदोलन केलं. दादरमधील शाखा क्रमांक 191 समोर आमदार महेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या सतत वाढणाऱ्या किमतींमुळे सामान्य जनतेचं आर्थिक गणित पूर्णपणे बिघडल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

या आंदोलनात महिला आघाडीने अनोख्या पद्धतीने सहभाग घेतला. महिलांनी गळ्यात भाज्यांचे हार घालत केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात निषेध व्यक्त केला. तसेच रस्त्यावर चूल पेटवत वाढत्या महागाईकडे सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. भांडी  वाजवात अनोखं आंदोलन केलं. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत केंद्र सरकारवर टीकाही करण्यात आली.

महागाईमुळे स्वयंपाकघराचं बजेट कोलमडलं असून सामान्य नागरिकांचं जगणं कठीण झालं आहे. सरकारने तातडीने इंधन दर आणि गॅस सिलेंडरच्या किमती कमी कराव्यात, अशी मागणी ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या आंदोलनामुळे दादर परिसरात काही काळ मोठी गर्दी पाहायला मिळाली.

Published on: Jun 03, 2026 05:51 PM

Follow Us