Nashik : येवल्यातील कलाकारानं 1008 पानांवर साकारली महादेवाची प्रतिमा
श्रावण सोमवार निमित्त 1008 बेलाच्या पानांचा वापर करून महादेवाची प्रतिमा येवल्यातील कलाकार संतोष राऊळ यांनी बेलाच्या पानांवर रंगांचा वापर करून साकारली असून महादेवाच्या मूर्तीच्या आजूबाजूला देखील बेलाचे पाने लावले असून या बेलांच्या पानावर देखील शिवशंभो ,महादेवाच्या विविध प्रतिमा,नावे देखील या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पेंट करून साकारली आहे.
नाशिक : कलाकार आपली कलाकारी विविध माध्यमातून नेहमी साकारत असतो. अशाच प्रकारे येवल्यातील( Yevala) संतोष राऊळ(santosh raul) या कलाकाराने श्रावण महिनाचे निमित्ताने 1008 बेलाचे पाने आणून ह्या सर्व बेलाच्या पानांना महादेवाचा( Lord Mahadev ) आकार देऊन त्यावर कलर देऊन ध्यानस्थ महादेवाची अप्रतिम अशी प्रतिमा साकारली आहे. या मूर्तीच्या आजूबाजूला देखील शेकडो बेलाचे पाने लावून त्यावर देखील महादेवाच्या विविध प्रतिमा, ओम नमः शिवाय, डमरू, त्रिशूल असे सर्व महादेवाचे नावे व शस्त्र आदी रेखाटले आहेत. या कलाकाराने आपल्या हाताच्या साह्याने पानावर कलरच्या माध्यमातून रेखाटन करून ही अनोखी प्रतिमा साकारली आहे. या कला कृती साकारण्यासाठी या कलाकाराला दोन दिवसाचा कालावधी लागला आहे. त्याच्या या अनोख्या कलेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

