जरांगे यांच्या मराठा आंदोलनाला सरकारच्या या 8 जाचक अटी,काय होणार पुढे ?
मनोज जरांगे पाटील यांच्या २९ ऑगस्टच्या मुंबईतील आंदोलनाला सरकारने आठ जाचक अटी लावलेल्या आहेत. त्यामुळे या आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न सरकारकडून सुरु आहे हे स्पष्ट झाले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात धडकण्याचा इशारा दिला आहे. आणि आज बुधवारी आंतरवाली सराटी येथून चलो मुंबईचा नारा देत सुरुवातही केली आहे. या आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने आधीच परवानगी नाकारलेली आहे. त्यानंतर आज राज्य सरकारने ८ अटी आणि शर्थी जाहीर केल्या आहेत. पहिल्या अटींनुसार जरांगे यांना आंदोलकांची संख्या ५ हजार असावी अशी अट मुंबई पोलिसांनी टाकली आहे, तसेच आंदोलन हे सकाळी ९ ते सायं.६ वाजेपर्यंतच करता येणार आहे,आंदोलनासाठी एका वेळी केवळ एका दिवसाची परवानगी दिलेली आहे,शासकीय-सार्वजनिक सुटीच्या दिवशी आंदोलन करता येणार नाही, आंदोलकांना ईस्टर्न फ्रीवेने वाडीबंदर जंक्शनपर्यंतच पोहचता येणार आहे आणि तेथेच वाहने पार्क करावी लागणार आहे, मुख्य आंदोलकासोबत केवळ ५ वाहने आझाद मैदानापर्यंत नेता येतील, इतर वाहनांसाठी शिवडी, ए-शेड आणि कॉटनग्रीन येथे पार्किंगची व्यवस्था केली आहे.

