मुंबईतील RBI बँकेला धमकीचा E-Mail, ‘या’ बँकांमध्ये बॉम्ब ठेवल्याची दिली धमकी
मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आला आहे. यामध्ये आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली असून आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याचीही धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे.
मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : मुंबईतील भारतीय रिझर्व्ह बँकेला ई-मेलद्वारे धमकीचा मेसेज आला आहे. यामध्ये आरबीआयच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली असून आरबीआय, एचडीएफसी आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याचीही धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. खिलाफत इंडिया नावाच्या ई-मेल आयडीवरुन ही धमकी देण्यात आलीय. आरबीआयच्या ई-मेल आयडीवर आज सकाळी साडेदहा वाजता ई-मेल आला होता. या ई-मेलमध्ये आज दुपारी दीड वाजता मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट होतील. आम्ही मुंबईतील 11 ठिकाणी हे बॉम्ब ठेवले आहेत, अशी धमकी ई-मेलद्वारे देण्यात आली होती. तसेच गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी ई-मेलमध्ये करण्यात आली आहे. गव्हर्नर आणि निर्मला सीतारमण यांनी राजीनामा न दिल्यास मुंबईतील 11 ठिकाणी बॉम्बस्फोट करण्यात येतील, अशी धमकी देण्यात आली आहे.
पेट्रोल-डिझेल टंचाईची शक्यता? पंतप्रधान मोदींच्या आवाहानाबाबत नागरिक..
पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; मोदींचं मोठं आवाहन, म्हणाले.....
निदा खानची 44 दिवस लपाछपी, छत्रपती संभाजीनगरातून कुठे सटकणार होती?
पीएम मोदींच्या सोनं खरेदीवरील आवाहनानंतर ज्वेलरी उद्योगाची प्रतिक्रिया

