सना नावाची मुलगी काश्मिरी तरुणीच्या संपर्कात, मुंबईत मोठा घातपात करणार? पोलिसांना धमकीचा फोन
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमलाही धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या फोन नंतर मुंबई पोलिसांकडून या फोनचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. तर ही धमकी का देण्यात आली? आणि […]
मुंबई, २२ नोव्हेंबर २०२३ : मुंबईत मोठा घातपात करणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमला हा धमकीचा फोन आला आहे. एका अज्ञात व्यक्तीकडून मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूमलाही धमकी देण्यात आली आहे. या धमकीच्या फोन नंतर मुंबई पोलिसांकडून या फोनचा सविस्तर तपास सुरू करण्यात आला आहे. तर ही धमकी का देण्यात आली? आणि ही धमकी कोणी दिली याचा अधिक तपास सुरू झाला आहे. मिळालेल्या माहिनीनुसार, मुंबई पोलीस कंट्रोल रुमला मिळालेल्या धमकीच्या फोनवर असे म्हटले की, सना नावाची एक महिला एका काश्मिरी तरुणीच्या संपर्कात आहे, असी माहिती या फोनकॉल वरून देण्यात आली. तसेच ते दोघेही मिळून मुंबईत मोठा घातपात करण्याच्या तयारीत आहेत, शोएब नावाच्या तरूणाने ही धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. पण पोलिसांकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

