AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला अन्…, कुठं घडली घटना?

| Updated on: May 15, 2023 | 3:23 PM
Share

VIDEO | ठाण्यात इमारतीच्या पहिल्या मजल्याचा स्लॅब कोसळला, 33 कुटुंबियांचं स्थलांतरित करण्याचं काम सुरू; कुठं घडली घटना?

ठाणे : ठाण्यातील भास्कर कॉलनी येथील अमर टॉवरच्या सात मजली इमारतीचा पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडली. स्लॅब कोसळून तीन ते चार जण जखमी तर इमारतीत राहणाऱ्या 33 कुटुंबांना ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्थलांतरित करण्याचे काम आणि पालिकेकडून सुरू आहे. अमर टॉवरच्या सात मजली इमारतीचा पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडताच घटनास्थळी महापालिका आपत्ती व्यवस्थापन, अग्निशमन दल, नौपाडा पोलीस आणि महापालिका कर्मचारी अधिकारी दाखल झालेत. या घटनास्थळी अडकलेल्या ०५ लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. त्यातील ०३ व्यक्तींना दुखापत झाली झाल्याचे समोर येत आहे. त्यांना उपचाराकरिता पराडकर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रथमेश सूर्यवंशी (पू / २८ वर्षे), विजया सूर्यवंशी (स्त्री / ५४ वर्षे) आणि अथर्व सूर्यवंशी (पू / १४ वर्षे) अशी दुखापतग्रस्तांची नावे आहेत. तर घटनास्थळी अडकलेल्या इतर ०२ व्यक्तींची नावे प्रियांका सूर्यवंशी (स्त्री / २४ वर्षे / कोणत्याही प्रकारची दुखापत नाही) आणि शिशिर पित्रे (पू / ६० वर्षे / सदर व्यक्तीस रूम नं. २०१ मधून सुखरुप) अशी आहेत. तसेच या घटनेत रूम नं. १०१ चा स्लॅब कोसळल्याने तळमजल्यावरील रूम नं. ०१ स्लॅबलाही काही प्रमाणात तडे गेले असून सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण इमारत रिकामी करण्याची कार्यवाही सुरू आहे.

Published on: May 15, 2023 03:23 PM