Akluj News : अकलूजच्या सयाजीराजे पार्कमध्ये मोठी दुर्घटना; थरारक व्हिडीओ व्हायरल
Akluj Park Video : अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक गंभीर जखमी झाला आहे.
अकलूज येथील सयाजीराजे वॉटर पार्कमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. या पार्कमधील फिरत्या पाळण्यामध्ये भीषण अपघाताची घटना घडली. या घटनेत एकाच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी आहे. हे दोन्ही पर्यटक मळशीरस तालुक्यातील रहिवासी होते. या घटनेचा थरारक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
पार्कमध्ये वेगात पाळणा फिरत असताना एक पाळणा निसटून पडल्याने पाळण्यातील दोघेजण जखमी झाल्याची माहिती आहे. या दुर्घटनेत एकजण अत्यंत गंभीर जखमी झाला. त्यांना उपचारासाठी घेऊन जात असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. तर अपघातातील जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून हा संपूर्ण व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

