tv9 Marathi Special Report | आई तुळजाभवानीच्या चरणी रेकॉर्डब्रेक सोनं; आकडा ऐकूनच व्हाल थक्क….
धाराशिव जिल्ह्यातील प्रसिद्ध तुळजाभवानी मंदिरात गेल्या दोन वर्षांत सोनं-चांदीच्या दानामध्ये विक्रमी वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातून येणाऱ्या भाविकांकडून देवीच्या चरणी मोठ्या प्रमाणात सोनं, चांदी आणि रोख रक्कम अर्पण केली जात असून, मंदिराच्या तिजोरीत दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. विशेष म्हणजे, दोन वर्षांच्या आकडेवारीनुसार दररोज सरासरी सात तोळे सोनं आणि तब्बल सात किलो चांदी देवीला अर्पण करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.

मार्च अखेरीस मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलेल्या मोजदादीत तुळजाभवानी मंदिरात तब्बल 253 किलो 30 ग्रॅम सोनं आणि सुमारे 4523 किलो चांदी जमा असल्याचे आढळून आले. या आकडेवारीमुळे मंदिराच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. श्रद्धा आणि भक्तीभावातून भाविक मोठ्या प्रमाणात दान करत असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, मागील काही वर्षांत दक्षिण भारतातून येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. त्याचा सकारात्मक परिणाम मंदिराच्या देणग्यांवरही होत असल्याचे दिसून येत आहे. तुळजाभवानी देवीवरील श्रद्धेमुळे भाविक सोनं-चांदीसह रोख देणग्याही मोठ्या प्रमाणात अर्पण करत आहेत. त्यामुळे तुळजाभवानी मंदिर देशातील श्रीमंत देवस्थानांपैकी एक म्हणून अधिक चर्चेत आले आहे.
Published on: May 12, 2026 11:44 AM
खरातवरील महाराष्ट्र एपस्टीन फाईल्समध्ये अनेक नेत्यांची व्यक्तिरेखा,
उद्धव ठाकरे, फडणवीस एकाच विमानाने रवाना, नेमकं काय घडलं? थेट व्हिडीओ आ
विलास घुले प्रकरणात हे काय घडलं? 'पुरावे मिटवण्यासाठी 10 व्या आरोपीला
प्रवाशांचा श्वास घुसमटला; तब्बल 20 मिनिटे... कोकण स्पेशल मांडवी एक्सप्