तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन दागिने चोरीला, मोठी माहिती समोर!
तुळजाभवानी मंदिरातील शिवकालीन दागिने गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
धाराशिव : अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या तुळजाभवानी देवीचे दागिने चोरीला गेल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. आता पुन्हा एकदा तुळजाभवानी देवीच्या चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत. शिवकालीन दागिने गायब झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दागिन्यांच्या ४ नंबरच्या अलंकार डब्यातील चांदीच्या पादुका चोरीला गेल्या आहेत.
मंदिर संस्थानकडून शिवकालीन दागिन्यांची पुन्हा एकदा मोजणी सुरू करण्यात आलीये. देवील अर्पण केलेल्या दागिन्यांच्या यादी बनवण्यात आल्या आहेत. मोजणीमध्येश आता ही धक्कादायक माहिती उघड झाली असून सर्वत्र याची चर्चा होताना दिसत आहे. काही जुने दागिने काढून त्या ठिकाणी नवीन दागिने ठेवत अदलाबदल केल्याचाही संशय कमिटीला आहे. त्यामुळेआता शिवकालीन दागिन्यांची पुन्हा एकदा मोजणी करण्याचं काम सुरू करण्यात आलं आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
