मुंबई महापालिकेसाठी शिवसेना-भाजप आमनेसामने, अरेला कारे करत फुंकले रणशिंग
मुंबईतून महापालिकेच्या निवडणुकीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणशिंग फुंकलं आहे. यावेळी मोदींनी मुंबईकरांना महापालिका निवडणुकीत आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं
मुंबईतून महापालिकेच्या निवडणुकीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रणशिंग फुंकलं आहे. यावेळी मोदींनी मुंबईकरांना महापालिका निवडणुकीत आशीर्वाद देण्याचं आवाहन केलं. एकीकडे आम्ही मोदींचीच माणसं आहोत असं म्हणणाऱ्या शिंदेंवर ठाकरे गटाने जोरदार टीका केली आहे. तर दूसरीकडे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या संजय राऊत यांनी, जम्मू मधून जळजळीत वार केल्याचेही पाहायला मिळाले.
मुंबईतून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकप्रकारे बीएमसी निवडणुकीच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या एका वक्तव्यानं, ठाकरे गटानं जोरदार टीका केली. नुकतंच गुंतवणुकीचे करार करुन, मुख्यमंत्री शिंदे दावोसवरुन परत आले आणि त्यानंतर तिथला अनुभव सांगताना, मुख्यमंत्र्यांनी आम्ही मोदींचेच माणसं आहोत आणि त्यांसोबतच आहोत असं जाहीरपणे सांगितलं. पण असं सांगण्यात कोणती मर्दुमकी, अशी टीका संजय राऊतांनी केली.
संजय राऊत यांच्या या जळजळीत टीकेनंतर, शिंदे गटाने पुन्हा संजय राऊत यांना घेरल्याचे पाहायला मिळाले. देवेंद्र फडणवीसांबरोबरच, स्वत: पंतप्रधान मोदींनीही पुढचं लक्ष्य मुंबई महापालिकाच आहे हे दाखवून दिलं आहे. मोदी आतापर्यंत थेट उद्धव ठाकरेंवर बोलले नाही, पण बीकेसीमधील मैदानातून, त्यांनी मुंबईतल्या रस्त्यांची स्थिती आणि महापालिकेच्या बँकेतल्या फिक्स डिपॉझिटवरुन निशाणा साधला.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

