रत्नागिरी अन् सिंधुदुर्गात शिंदे गटाला लवकरच मोठं भगदाड पडणार?, कुणाचा गौप्यस्फोट?
VIDEO | शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉटसअप स्टेटसवर ठेवलेल्या एका स्टेटसने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण, अशातच ठाकरे गटाच्या नेत्यानं केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले, 'लवकरच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाला मोठ भगदाड पडणार'
सिंधुदुर्ग, २९ सप्टेंबर २०२३ | शिंदे यांच्या शिवसेनेतील मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी त्यांच्या व्हॉटसअप स्टेटसवर ठेवलेल्या एका स्टेटसने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत. दरम्यान, किरण सामंत यांच्यासारखे अनेकजण उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत येण्यासाठी सज्ज आहेत. लवकरच रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये शिंदे गटाला मोठ भगदाड पडेल, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी किरण सामंत यांच्या स्टेटसवर बोलताना केला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण सामंत यांनी आज मशाल चिन्ह आपल्या स्टेटसवर ठेवलं होतं, यावर प्रतिक्रिया देताना विनायक राऊत यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, लवकरच भाजप शिंदे गटाचं विसर्जन करेल आणि याचीच कुठेतरी चाहुल किरण सामंत यांना लागल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असावा. लवकरच आपल्याला आणखी मोठे धक्के पाहायला मिळतील, असा गौप्यस्फोट खासदार विनायक राऊत यांनी केला आहे.
जागावाटपाचा तिढा फडणवीसांच्या दरबारात, भाजपकडून 115 जणांची नाव निश्चित
पुण्यात ठाकरेंची सेना अन् मनसेची युती होणार? कोण किती जागांवर लढणार?
राज ठाकरेंवर माझी नाराजी नाही, पण... दिनकर पाटलांची पहिली प्रतिक्रिया
भाजप कार्यकर्त्यांचा विरोध तरीही मनसेचे दिनकर पाटील भाजपात अन्..

