Sushma Andhare यांनी दादा भुसे यांच्यावर केलेल्या आरोपांवर उदय सामंत यांचं भाष्य म्हणाले, ‘… हा डाव’
VIDEO | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील याला शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा सपोर्ट असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केलाय. म्हणाले, 'दादा भुसे मंत्रिमंडळातील कार्यक्षम नेते, त्यांना बदनाम करण्याचा डाव'
मुंबई, ११ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललीत पाटील हा ससून रुग्णालयातून फरार झाल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे. दरम्यान, ललीत पाटील याला शिंदे गटाचे मंत्री दादा भुसे यांचा सपोर्ट असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला. यावर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी पलटवार केलाय. आरोप कुणी कुणावर करावे, याबाबत आता कोणतीच बंधन राहिलेली नाहीत. त्यामुळे दादा भुसे हे राज्य मंत्रिमंडळातील सक्रीय, कार्यक्षम मंत्री आहेत. आणि त्यांना बदनाम करण्याचा डाव असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले. तर कुठलेही पुरावे नसताना आरोप करणं हे ठाकरेंचं नित्याचेच काम झालेयत, सकाळी दुपारी आरोप करतात, बदनाम करतात, आम्हाला काही फरक पडत नाही, आरोपात काही तथ्य नाही, सुषमा अंधारेंचे आरोप बिनबुडाचे असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले असून मंत्री दादा भूसे यांना फसवण्याचा प्रयत्न होत आहे, असे म्हणत उदय सामंत यांनी पलटवार केलाय.
Published on: Oct 11, 2023 12:50 PM
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
आमदार अपात्रता निर्णयावर राहुल नार्वेकरांचं मोठं वक्तव्य...
फडणवीसांच्या निर्देशाने महा-आयडी; नागरिकांना मिळणार एकच डिजिटल ओळख
