Udayanraje | ही बँक गरीब शेतकऱ्यांची, हात जोडून विनंती करतो…, ईडीच्या नोटीसवरून उदयनराजे संतप्त

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आल्याबद्दल माहिती विचारली होती. त्यावेळी ही बाबत न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचं पत्र जिल्हा बँकेकडून उदयनराजेंना पाठवण्यात आलंय.

राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची नोटीस आल्याबद्दल माहिती विचारली होती. त्यावेळी ही बाबत न्यायप्रविष्ठ असल्यामुळे माहिती देता येणार नसल्याचं पत्र जिल्हा बँकेकडून उदयनराजेंना पाठवण्यात आलंय. उदयनराजे भाोसले यांनी बँकेच्या उत्तरावर  संतप्त प्रतिक्रिया दिलीय. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे ती राहू द्या. त्यांची जिरवू नका, ही विनंती, असं उदयनराजे हात जोडून म्हणाले.  अनेकांना वाटत असेल की मला मस्ती आलीय. मेहरबानी करा माझी कुणी जिरवू नका. मी कुणाचा दुश्मन नाही. ही बँक गरीब शेतकरी सभासदांची आहे. ही बँक राहूद्या. त्यांची जिरवू नका ही विनंती. ते कोण मला पॅनलमध्ये घेणारे, मी ठरवतो कुठे जायचं. कुठल्याही परिणामांना मी घाबरत नाही. व्हायचं ते होऊ द्या, असं उदयनराजे माध्यमांशी बोलताना म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI