Chandrayaan-3 : ‘जे कोणाला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखवले’; उद्धव ठाकरे यांचे गौरवद्गार
चंद्रयान ३ मोहीमेच्या यशस्वी लँडिंगनंतर भारताच्या कानो कोपऱ्यात आनंद साजरा होत आहे. त्याचदरम्यान ठाकरे गटाचे प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई, २४ ऑगस्ट २०२३ | इस्त्रोच्या वैज्ञानिकांच्या कष्टाचे काल चिज झाले. त्यांच्या परिश्रम आणि अथक प्रयत्नांमुळे देशाने मोठं यश मिळवलं आहे. भारताच्या चांद्रयान-३ विक्रम लँडर यशस्वीरित्या चंद्रावर काल उतरले. त्यानंतर अख्या देश आनंदात न्हाऊन निघाला. देशात उत्साह पाहायला मिळाला. लोक इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन करताना दिसले. तर सर्वच राजकीय पक्षांनी इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील इस्त्रोच्या वैज्ञानिकांचे अभिनंदन केले. यावेळी त्यांनी आपली प्रतिक्रिया देताना, भारताचे चंद्रयान सुरक्षित रित्या चंद्रावर उतरले. जे कोणाला साध्य झाले नाही ते भारताने करून दाखवलं. सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे. सर्व वैज्ञानिकांचे आणि नागरिकांचे हार्दिक अभिनंदन! अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना बोलून दाखवल्या. त्याचबोरबर ‘हिंदुस्थानाने आज चंद्रावर पाऊल ठेवून इतिहास घडवला आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात अथक परिश्रम आणि संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचे हे यश असून त्यांनी हा इतिहास घडवला. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके कमीच, असेही ठाकरे म्हणाले.
Published on: Aug 24, 2023 08:28 AM
एसआयआर मोहिमेतून महाराष्ट्रातील 2.07 कोटी मतदारांची नावे वगळली
मुंबई महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजपमधील शीतयुद्ध सुरूच
मुंबई बँक निवडणुकीवरून दरेकरांचे सूचक विधान
Instagram वर इशारा, हातावर नोट लिहून डॉक्टराचा टोकाचे पाऊल उचलण्याचा..
