Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray Video : '...मोदींकडे मागणी करा', औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

Uddhav Thackeray Video : ‘…मोदींकडे मागणी करा’, औरंगजेबाच्या कबरीवरून सुरू असलेल्या वादावर उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य

| Updated on: Mar 18, 2025 | 6:04 PM

'औरंगजेब हा महाराष्ट्र जिंकण्यासाठी आला होता, पण तो महाराष्ट्राच्या मातीचा एक कणही जिंकू शकला नाही. पण महाराष्ट्राने त्याला मूठमाती दिली. अशा औरंगजेबाचे समर्थन कोणीही शिवप्रेमी करणार नाही. '

औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मुद्यावरुन राज्यातील राजकीय वातवारण चांगलंच तापलं असताना राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप देखील सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवा अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेसह बजरंग दलाकडून देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरात दोन गटात राडा झाला. दरम्यान, औरंगजेबाची कबर हटवण्यावरून वाद-विवाद सुरू असताना उद्धव ठाकरेंनी आपली यासंदर्भात पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आंदोलनापेक्षा कबर उखडून टाकण्याची मोदींकडे मागणी करा, असे वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केले आहे. नागपुरात झालेल्या राड्यावरून उद्धव ठाकरेंनी सल्ला दिला आहे. औरंगजेबाचं थडगं उखडून विषय संपवा, असं त्यांनी म्हटलं आहे. एका बाजूला अपमान करायचा आणि दुसरीकडे हिंदू-मुस्लीम दंगली घडवायच्या. जर तुम्हाला हिरव्या रंगाचा एवढा राग असेल तर पहिले तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग हटवा, असा आव्हानच भाजपला ठाकरेंनी दिलं आहे. पुढे ते असेही म्हणाले, औरंगजेब असो की अफजल खान असो ही छत्रपतींच्या पराक्रमाचे पुरावे आहेत आणि हेच तुम्हाला नष्ट करायचे असतील आंदोलन काय करताय? असा सवालच ठाकरेंनी यावेळी केलाय.

Published on: Mar 18, 2025 06:04 PM