AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी

मोठी बातमी! उमेदवारी मागे घेताच उद्धव ठाकरेंचा दणका; बाळ माने यांची ठाकरे सेनेतून हकालपट्टी

| Updated on: Jun 04, 2026 | 3:25 PM
Share

कोकणातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळ माने यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.

कोकणातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळ माने यांच्यावर कठोर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याचा ठपका ठेवत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून बाळ माने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने पक्षामध्ये नाराजी निर्माण झाली होती. त्यानंतर पक्ष नेतृत्वाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाईचा निर्णय घेतला.

याबाबत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर माहिती देत बाळ माने यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे जाहीर केले. पक्षविरोधी भूमिका आणि पक्षाच्या अधिकृत भूमिकेच्या विरोधात केलेल्या कृतीमुळे ही कारवाई करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बाळ माने यांनी आपल्या निर्णयाचे समर्थन करत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, शिवसेना पक्षाकडून त्यांना पाठिंबा मिळत होता. मात्र महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांकडून अपेक्षित सहकार्य मिळाले नाही. मतदारसंघातील आवश्यक संख्याबळ नसल्यामुळेच आपण निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या घडामोडीमुळे कोकणातील राजकीय वातावरण तापले असून, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील समन्वय आणि अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनले आहे.

Published on: Jun 04, 2026 03:25 PM

Follow Us