उद्धव ठाकरेंना आणखी मोठा हादरा! विश्वासू महिला नेत्याच्या राजीनाम्यानंतर…
महाराष्ट्राच्या राजकारणात पक्षांतर आणि राजीनाम्यांच्या घटनांमुळे सातत्याने नवी समीकरणे तयार होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच उद्धव ठाकरे यांच्या गटाला कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या विश्वासू महिला नेत्या वैशाली दरेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. वैयक्तिक कारणांमुळे आपण पदाला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
राजीनामा दिल्यानंतरही आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतच राहणार असल्याचे वैशाली दरेकर यांनी स्पष्ट केले. “मी आपल्या पदाचा राजीनामा दिलेला असला तरीही मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सदस्या म्हणून कार्यरत राहणार आहे,” असं त्यांनी सांगितलं.
दरेकर यांच्या राजीनाम्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. त्यांच्या निर्णयामागे केवळ वैयक्तिक कारणे आहेत की भविष्यात त्या काही वेगळी राजकीय भूमिका घेणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Published on: Aug 03, 2026 05:41 PM
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरेंना...उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सुरू असलेली सुनावणी आज संपली, मात्र...
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..