Union Budget 2026 : देशात पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर होणार!
Nirmala Sitharaman Budget Announcement : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण कर्तव्य भवनातून अर्थसंकल्प 2026 सादर करण्यासाठी निघाल्या आहेत. आज पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर होत असल्याने देशाचे लक्ष लागले आहे. निवडणुका नसल्यामुळे आकर्षक घोषणांऐवजी धोरणात्मक निर्णयांवर भर दिला जाण्याची अपेक्षा अर्थतज्ञांनी व्यक्त केली आहे. कृषी, उद्योग, रोजगार आणि आर्थिक आव्हानांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज केंद्रीय अर्थसंकल्प 2026 सादर करण्यासाठी सज्ज झाल्या आहेत. कर्तव्य भवन येथून आपल्या टीमसोबत हातात बही खाता घेऊन त्या संसद भवनाकडे रवाना झाल्या. सकाळी 11 वाजता त्या लोकसभेत अर्थसंकल्प सादर करतील.
देशाचे लक्ष राजधानी नवी दिल्लीकडे लागले असून, सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पातून नेमक्या काय अपेक्षा आहेत, यावर चर्चा सुरू आहे. अर्थतज्ञ डॉ. नरेश बोडके यांनी टीव्ही9 मराठीशी बोलताना सांगितले की, सध्या कुठल्याही निवडणुका नसल्याने, आकर्षक आणि थेट राजकीय घोषणांची शक्यता कमी आहे. त्यामुळे फ्रीबीज किंवा तात्काळ नफा देणाऱ्या योजनांवर नियंत्रण ठेवले जाऊ शकते, असा त्यांचा अंदाज आहे.
अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तो मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल आणि त्यानंतर त्याला मान्यता मिळाल्यावरच संसदेत सादर केला जाईल. कित्येक वर्षांनंतर पहिल्यांदाच रविवारी अर्थसंकल्प सादर केला जात असल्याने याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी, उद्योग, एमएसएमई, रोजगार निर्मिती आणि देशापुढील आर्थिक आव्हानांवर या अर्थसंकल्पातून कसे मार्ग काढले जातात, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
Published on: Feb 01, 2026 10:25 AM
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
