अमेरिका भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावणार आहे, अशी मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. दरम्यान, अमेरिकेच्या निर्णयाचा फटका जगभरातल्या देशांना बसू शकतो. अमेरिकेकडून भारतावर 26 टक्के आयात शुल्क लावण्यात येणार असल्याची मोठी घोषणा अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून बुधवारी रात्री करण्यात आली आहे. अमेरिका प्रमुख प्रतिस्पर्धी देश असलेल्या चीनवर 34 टक्के आयात शुल्क आकारणार आहे. अमेरिकेच्या निर्णयाचा फटका जगभरातल्या देशांना बसू शकतो.
या आयात शुल्कात वाढ केल्याने कृषी, मौल्यवान खडे, रसायन, इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्मिती आणि यंत्र निर्मिती क्षेत्रांवर परिणाम होण्याचा अंदाज आहे. औषध निर्माण, वैद्यकीय साहित्य निर्मिती क्षेत्रावर सुद्धा परिणाम होण्याचा अंदाज आहे. अमेरिका सरकारने आयात शुल्कातील बदलाच्या अनुषंगाने 2 एप्रिलची मुदत निश्चित केली होती. दरम्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच अमेरिकेत येऊन गेले होते. ते माझे चांगले मित्र आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सांगितलं, तुमचा आमच्यासोबतच व्यवहार योग्य नाही. भारत अमेरिकेकडून 52 टक्के टॅरिफ वसूल करतो त्यामुळे आम्ही त्यांच्यावर निम्मा 26 टक्के कर लावणार आहोत, असं ट्रम्प यांनी सांगितलं.