Vianayak Mete Accident: माझ्या मते ड्रायव्हरला डुलकी लागली आणि अपघात घडला असावा- अजित पवार
ड्राइव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. रात्रीचा प्रवास हा सहसा टाळायला हवा असेही ते म्हणाले. गाडगी चार दिवस आधीच अजित पवार यांची विनायक मेटेंशी भेट झाली होती.
विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विनायक मेटे यांच्या अपघातावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या मते ड्राइव्हरला डुलकी लागल्याने हा अपघात झाला असावा अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली आहे. रात्रीचा प्रवास हा सहसा टाळायला हवा असेही ते म्हणाले. गाडगी चार दिवस आधीच अजित पवार यांची विनायक मेटेंशी भेट झाली होती. 15 सप्टेंबरला होणाऱ्या कार्यक्रमासाठी निमंत्रण द्यायला ते आले होते असे पवार म्हणाले. माझ्या अतिशय जवळचा सहकारी आणि मराठा समाजासाठी भांडणारा नेता गमावला असल्याचे अजित पवार म्हणाले. या अपघातात ड्रायव्हर सह इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अद्याप कुठलीही चौकशी झाली नसल्याने अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
