AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar | कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; विजय वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं

Vijay Wadettiwar | कार्यकर्ते बाजूला, उद्योगपती पुढे?; विजय वडेट्टीवारांनी भाजपला धारेवरच धरलं

| Updated on: Jun 01, 2026 | 1:31 PM
Share

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 17 पैकी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उद्योगपती अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 17 पैकी 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून उद्योगपती अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या उमेदवारीनंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या असून, काँग्रेसचे नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपचे उमेदवार अरुण लाखानी हे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या व्याही आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली जात आहे. यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “लाखानी हे पवार कुटुंबाचे नातेवाईक आहेत, तर यात पवारांचा नेमका काय संबंध? उमेदवारी भाजपने दिली आहे. मग हा प्रश्न भाजपलाच विचारायला हवा. पवारांना विचारून उमेदवारी दिली का? याचे उत्तर भाजपने द्यावे,” असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

भाजप उमेदवारी देताना स्थानिक कार्यकर्त्यांना डावलत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “भाजपला नेहमी उद्योगपती, मोठे व्यावसायिक आणि प्रभावशाली व्यक्तीच हव्या असतात. पक्षासाठी वर्षानुवर्षे काम करणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मात्र विसर पडतो,” अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. दरम्यान, विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि राजकीय समीकरणांवरून आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून, आगामी काळात हा वाद आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Published on: Jun 01, 2026 01:31 PM

Follow Us
‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?

Vikram 1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च.

Vikram 1 Launch : भारताच्या अवकाश क्षेत्रातील ऐतिहासिक क्षण, पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच….

धर्मेंद्र प्रधान यांना असं काय सोनं लागलं? उद्धव ठाकरे यांचा केंद्राला सवाल; नागपुरात येताच…

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले.

Navi Mumbai Crime : डी-मार्टजवळ मध्यरात्री थरार, रस्त्यावर तरूणासोबत जे घडलं… त्या दृश्याने पोलिसही हादरले

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक.

Aamir Khan : श्वासही घेऊ देणार नाही… सलमान नंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या रडारवर? मिळाली मोठी धमकी; कारण धक्कादायक

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?.

Ashok Kharat : लिंगपिसाट खरात गोत्यात..3 हजार पानी आरोपपत्र दाखल, 42 कोटींचं घबाड आणि… आरोपपत्रात काय काय?