Ganeshotsav 2025 : 18 वा गणेशोत्सव… थायलंडमध्ये भक्ती, संस्कृती अन् एकतेचा अनोखा संगम
गणेश मूर्तीचे विशेष आकर्षण म्हणजे १० फूट उंच मूर्ती, जी विशेषतः भारतातील कुशल कलाकारांनी परदेशात बनवली होती. मूर्तींच्या कलात्मकता, भक्ती आणि कारागिरीने उपस्थित लोकांची मने जिंकली.
थायलंडचा सर्वात मोठा आणि भव्य विश्व हिंदू परिषद असोसिएशन चा १८ वा वार्षिक गणेशोत्सव नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. बँकॉकमधील निमिबुत्रा स्टेडियममध्ये विश्व हिंदू परिषद असोसिएशन थायलंडने आयोजित केलेल्या या उत्सवात हजारो भाविकांनी सहभाग घेतला. भारत आणि थायलंडमधील सांस्कृतिक सेतूचे प्रतीक असलेला हा उत्सव भक्ती, कला आणि एकतेचा एक अनोखा संगम होता.
पुणेरी ढोल हे या वर्षीच्या बँकॉक मधिल विश्व हिंदू परिषद असोसिएशन महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरले . पुण्यातील श्रीमंत दगडुशेठ संस्थापने द्वारा १५ सदस्यांच्या ढोल-ताशा पथकासोबत ‘नादब्रह्म’ ढोलाची ही पहिलीच वेळ होती आणि त्यांच्याकडून वाजवण्यात येणाऱ्या पुणेरी ढोलाचा आवाज स्टेडियम आणि बँकॉकमध्ये घुमत होता. प्रेक्षकांनी या उत्सवात सहभाग घेतला आणि बँकॉकमध्ये मराठी ढोल-ताशाच्या परंपरेचा कार्यक्रम ऐतिहासिक ठरला.
Published on: Sep 03, 2025 04:30 PM
ठाकरे नेतृत्वावर प्रश्न?; ते काही एवढे महान नाहीत म्हणत राऊतांचा संताप
राजुल पाटील ठाकरेंसोबत, पण सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; आम्ही...
धाराशिवमध्ये शक्तीप्रदर्शन! ओमराजेंच्या निर्णयाने बदलणार राजकीय गणित
गिरीश महाजनांचे व्हायरल केलेले फोटो एडिटेड असल्याचं स्पष्ट
