AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिक पदवीधर मतदारसंघात पाटील-तांबेंमध्ये लढत, जाणून घ्या दिवसभरातील ताज्या घडामोडी

नाशिक पदवीधर मतदारसंघात पाटील-तांबेंमध्ये लढत, जाणून घ्या दिवसभरातील ताज्या घडामोडी

Harshada Shinkar
Harshada Shinkar | Updated on: Jan 30, 2023 | 9:05 AM
Share

जाणून घ्या, दिवसभरातील महत्त्वाच्या राजकीय, सामाजिक बातम्यांचे अपडेट्स

शिवसेना आणि धनुष्यबाण या चिन्हावर आज फैसला होण्याची शक्यता आहे. ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगामध्ये लेखी उत्तर दाखल करण्यात येणार आहे. पदवीधर शिक्षक मतदारसंघासाठी आज मतदान होत असून ५ मतदारसंघातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात शुभांगी पाटील आणि सत्यजित तांबे यांच्यामध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे तर सत्यजित तांबे अपक्ष उमेदवार म्हणून लढत असल्याने या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे. तर नागपुरात गाणार-आडबोल यांच्यामध्ये देखील चुरशीची लढत असून गटबाजीमुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासह अमरावतीमध्ये डॉ. रणजित पाटील विरूद्ध धीरज लिंगाडे यांच्यात लढत तर मराठवाड्यात किरण पाटील- विक्रम काळे यांच्यात चुरस पाहायला मिळत आहे.

मुंबईत आज आणि उद्या दोन दिवस दुरूस्तीच्या कामासाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार असल्याने दोन दिवस पाणी कपात असणार आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई दौऱ्यात मुंबईकरांना मोठं गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे. मुंबई-शिर्डी आणि मुंबई-सोलापूर वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार…

Published on: Jan 30, 2023 08:59 AM
Follow Us