Sanjay Raut : आम्हाला हिंदुत्वाच्या प्रमाणपत्राची गरज नाही, संजय राऊतांचा टोला
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी हा आमचा राजकीय दौरा नसल्याचं स्पष्ट केल.
लखनौ: ‘आम्हाला हिंदुत्वाचं (Hindutwa) प्रमाणपत्र देण्याची गरज नाही. प्रमाणपत्र देण्यासाठी तुम्ही काय युनिव्हर्सिटी उघडली आहे का? विरोध करणाऱ्यांची आडनावं पोटदुखे आहेत. आम्ही काहीही केलं तरी त्यांच्या पोटात दुखतं. पण आम्ही, आमचा अंतरात्मा, कार्य हेच आमचं हिंदुत्व काय आहे ते ठरवेल. एखाद्या पक्षाची साथ सोडली असेल. पण हिंदुत्वाला सोडून राजकीय स्वार्थासाठी खुर्चीसाठी आम्ही राजकारण केलं नाही. त्यामुळे कोण काय बोलतंय, हे पहायची गरज नाही, हे नकली लोकं आहेत, अशा शब्दात शिवसेना नेते संजय राऊतांनी (Sanjay Raut) शिवसेनेच्या हिंदुत्वावर टीका करणाऱ्यांना सुनावलं. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत यांनी अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी हा आमचा राजकीय दौरा नसल्याचं स्पष्ट केल. दरम्यान, आपलं हिंदुत्व ठसवून सांगण्यासाठी हा दौरा तसेच भाजपने (BJP) काश्मीरमध्ये मेहबुबा मुक्तीसोबत गेलेलं चाललं. राम मंदिरबाबत संघाला खतम करण्याची भाषा केली. पण राजकीय सोयीसाठी बदललेल्या भूमिका, हे राजकारण आम्ही केलेलं नाही, असंही यावेळी राऊत म्हणालेत.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

