आम्ही सांगतो तेव्हा पुराव्यासहच सांगतो -Sanjay Raut
कधी राम मंदिराच्या नावाने तर कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले. आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान आहे. त्याचा लिलाव करता आणि त्या भ्रष्ट गुन्हेगाराचाी बाजू घेता? तुम्ही नेहमी अभ्यास करून बोलता असा दावा करता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार झाला नाही?
कधी राम मंदिराच्या नावाने तर कधी गंगाजल विकून पैसे गोळा केले. आयएनएस विक्रांत आमचा स्वाभिमान आहे. त्याचा लिलाव करता आणि त्या भ्रष्ट गुन्हेगाराचाी बाजू घेता? तुम्ही नेहमी अभ्यास करून बोलता असा दावा करता मग तुमच्याकडे असा काय पुरावा आहे की भ्रष्टाचार झाला नाही? आम्ही सांगतो तो पुरावा नाही का? तुमचंच राजभवन आहे. आमचे नाही. तिथे तुमचेच आदेश पाळले जातात, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
सेव्ह विक्रांतच्या नावाखाली झालेल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा देशभरात गाजणार. शिवसेनेने राज्यसभेत स्थगन प्रस्ताव दिला. आज महाराष्ट्रात या भ्रष्टाचाराविरोधात आंदोलन होणार आहे. आम्ही स्वस्थ बसणार नाही. देशद्रोहींना तुरुंगात टाकू. देशभक्तीचे मुखवटे लावून लोकांना मूर्ख बनवलं आहे. तुमचे मुखवटे गळून पडले आहेत. हे एक लहानसं प्रकरण आहे. अजून आणखी प्रकरण काढू. आयएनएस विक्रांत भंगारात जरी घालवली असली तरी हे फालतू पुढारी आणि त्यांचे पक्ष अरबी समु्रदात बुडवल्या शिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर

