यवतमाळ हादरलं! कुटुंब संपवण्यासाठी घराभोवती तारा बांधून वीज सोडली, महिलेचा मृत्यू
राजकीय वैमनस्यातून वाचपा काढण्यासाठी चक्क विरोधकांच्या घराभोवती तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडून कुटुंबाला संपवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
राजकीय वैमनस्यातून वाचपा काढण्यासाठी चक्क विरोधकांच्या घराभोवती रात्री दरम्यान तारा बांधून त्यात वीज प्रवाह सोडण्यात आला. यात एक 37 वर्षीय महिलेचा विजेच्या धक्क्याने जागी मृत्यू झाला तर तिचा पती यात जखमी झाला ही घटना यवतमाळच्या घाटंजी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या अंजी नाईक येथे उघडकीस आली. सविता पवार असे करंट लागून मृत झालेल्या महिलेचे नाव आहे. तर मनेश पवार असे जखमी झालेल्या मृतक महिलेच्या पतीचे नाव आहे.
घराला करंट लावून जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप मृतकाचे काका दत्ता पवार यांनी केला आहे. मृत महिलेच्या पतीने घाटंजी पोलीस ठाण्यात तक्रार मणेश पवार यांनी दिली. गावात अनुचित घटना घडू नये यासाठी गावात दगंल नियंत्रण पथक आणि पोलिस कर्मचाऱ्यांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आला. या प्रकरणी घाटंजी पोलिसांनी
मनेश देवराव पवार याच्या तक्रारीवरून घाटंजी पोलिसांनी इंदल मोतीराम राठोड, सुदाम जयराम चव्हाण, गणेश केशव राठोड, विनोद रामकृष्ण चव्हाण, राजू कवडू जाधव, चेतन निवृत्ती चव्हाण या 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. घटनेनंतर घाटंजी पोलिसांनी दोघांना अटक केली.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?

