AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण... नेमकं काय घडलं?

मुंबईत पुन्हा नेस्कोसारखाच प्रकार! लाईव्ह कॉन्सर्टमध्ये तरुण आणि त्याची मैत्रीण… नेमकं काय घडलं?

| Updated on: Jun 07, 2026 | 11:26 AM
Share

मुंबईतील वरळी येथील NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका 28 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

मुंबईतील वरळी येथील NSCI डोममध्ये आयोजित करण्यात आलेल्या लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टदरम्यान एका 28 वर्षीय तरुणाचा अचानक मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे कार्यक्रमस्थळी एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

मृत तरुणाचे नाव वृषभ महेंद्र गांगुर्डे असे असून तो माहिम परिसरात राहत होता. वृषभ हा आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत या म्युझिक इव्हेंटला आला होता. कार्यक्रमादरम्यान त्याने मोठ्या प्रमाणात मद्यपान केल्याची माहिती समोर आली आहे.

इव्हेंटमध्ये मोठी गर्दी झाल्याने वृषभ आणि त्याच्यासोबत असलेल्या एका मैत्रिणीला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर दोघांनाही तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच वृषभचा मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेल्या मैत्रिणीची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी कार्यक्रमस्थळी धाव घेत आयोजकांकडील CCTV फुटेज जप्त केले आहेत. तसेच ड्रग्ज किंवा अन्य अंमली पदार्थांचे सेवन झाले होते का, या दिशेनेही तपास सुरू करण्यात आला आहे.

Published on: Jun 07, 2026 11:23 AM

Follow Us