बहुत मारेंगे तेरे को चल… अंजिठामधील यूट्युबरला धमकी, छत्रपती संभाजीनगर नही, वो…
औरंगाबाद शहराचे नाव बदलून 'छत्रपती संभाजीनगर' केल्यापासून या नावावरून वाद निर्माण होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरच्या अजिंठामधील एका युट्युबरने 'छत्रपती संभाजीनगर' असं नाव म्हटल्याने धमकी मिळाल्याची बातमी समोर आली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधून एक बातमी आहे. छत्रपती संभाजीनगर मधील अजिंठा येथील एका युट्युबरला धमकी देण्यात आली आहे. अजिंठा येथील एका युट्युबरने आपल्या व्हिडीओमध्ये छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केल्याने युट्युबरला धमकी देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ‘छत्रपती संभाजीनगर नही… औरंगाबाद हे वो..’, असं धमकी देणाऱ्याने म्हटलं असल्याची माहिती आहे. इतकंच नाहीतर बहुत मारेंगे तेरे को.. चल निकल इधर से.. असं म्हणत युट्युबरला धमकावल्याचे पाहायला मिळालंय. तर युट्युबरला धमकी दिल्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी 1988 पासून केली जात होती. बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘संभाजीनगर’ अशी घोषणा केली होती. औरंगाबाद शहराचे नाव बदलून ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी 1988 पासून केली जात होती. बाळासाहेब ठाकरे यांनीही ‘संभाजीनगर’ अशी घोषणा केली होती. महाविकास आघाडी सरकारचा निर्णय नियमबाह्य असल्याचं कारण देत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने 16 जुलै 2022 रोजी पुन्हा मंत्रिमंडळात औरंगाबादचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ असे करण्याचा निर्णय घेतला. तर 15 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र शासनाने राजपत्र प्रकाशित करून औरंगाबाद जिल्ह्याचे नावही ‘छत्रपती संभाजीनगर जिल्हा’ असे अधिकृतपणे बदलले.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

