Saamana : हिंदुत्ववादी, नवे टिळेधारी अन् भाजपमधील बाटगे… ‘सामना’तून मंत्री नितेश राणेंवर प्रहार, नेमकी टीका काय?
'संयुक्त महाराष्ट्र लढ्यात शाहीर अमरशेखांची ललकारी आजही महाराष्ट्राच्या कणाकणांत घुमते आहे, पण हिंदुत्वास विकृत स्वरूप देऊन काहींना राजकीय आगी लावायच्या आहेत. त्यांच्या पार्श्वभागास सरसंघचालकांच्या भूमिकेने आग लागली आहे.'
मुसलमान समुदयासोबत संघाचा जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणत सामनातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे. तर भाजपमधील बाटग्या हिंदुत्ववाद्यांना हे रूचेल का? असा सवाल देखील सामानातून करण्यात आला आहे. तर नव्या टिळेधाऱ्यांना भागवतांच्या भूमिकेमुळे धक्काच बसला असेल, असा टोला लगावण्यात आलाय. सामना अग्रलेखातून मंत्री नितेश राणे यांच्यावर टीकास्त्र डागण्यात आलं आहे.
‘हिंदुस्थानातील हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच आहे. त्यामुळे दोन्ही समाजांनी एकत्र काम करणे गरजेचे आहे. आपण सगळे एकाच बोटीत आहोत. बोट बुडाली तर सगळेच बुडतील ही सरसंघचालकांची भूमिका राष्ट्र निर्माणाची आहे. त्याबद्दल त्यांचे स्वागत करावे तेवढे थोडेच’, असं सामानातून म्हटलंय तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशातील सत्तरहून अधिक मौलवी आणि मुस्लिम विचारवंतांची भेट घेतली. भागवत यांनी या सगळ्या मंडळींशी सविस्तर चर्चा करून चहापान केले. त्यांचे मनोगत समजून घेतले. देशात भाजपमधील काही मंडळींकडून जे धार्मिक तणावाचे वातावरण निर्माण केले जात आहे, मुस्लिम समाजास लक्ष्य केले जात आहे, त्यावर या बैठकीत चर्चा झाली. तर मुसलमान समुदायासोबत संघाने जवळीक साधण्याचा केलेला हा प्रयत्न भाजपमधील बाटग्या हिंदुत्ववाद्यांना रुचेल काय? असा सवालही सामनातून करण्यात आलाय.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

