AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कोकाटेंचा नंबर पक्का, मंत्रिमंडळात फेरबदल? 'या' मंत्र्यांचा पत्ता कट? एकूण किती विकेट जाणार?

कोकाटेंचा नंबर पक्का, मंत्रिमंडळात फेरबदल? ‘या’ मंत्र्यांचा पत्ता कट? एकूण किती विकेट जाणार?

| Updated on: Jul 26, 2025 | 10:44 AM
Share

दिल्ली दौऱ्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी अमित शहा यांची भेट घेतली. ज्यामध्ये मंत्रिमंडळात फेरबदलावरून चर्चा झाल्याची माहिती मिळते. वादग्रस्त मंत्र्यांवरून शहांनी संताप व्यक्त केल्याचही कळतंय. एकूण तीन ते चार मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याचही समजतंय.

मुख्यमंत्री फडणवीसांची दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसोबत 25 मिनिटं खलबतं झाली आणि ही बैठक मंत्रिमंडळातल्या फेरबदलावरून झाल्याची माहिती आहे. यात नेमकी कुणाची एन्ट्री आणि कोणाला डच्चू हे ठरल्याचंही समजतंय. भेटीत मंत्र्यांच्या गैरवर्तनावरून अमित शहा भडकल्याचं कळतंय. वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्यासंदर्भात चर्चा झाल्याची ही माहिती आहे.

सध्या तीन मंत्र्यांची विकेट जाणार असल्याचं कळतंय. ज्यात वादग्रस्त मंत्र्यांवर टांगती तलवार आहे. यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे विधान परिषदेतच कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आला. या आधी सुद्धा शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्यांनी सरकारची अडचण वाढवणाऱ्या कोकाटेंनी सरकारलाच भिकारी म्हटलंय. सोमवारी कोकाटेंचा निर्णय घेऊ असे अजित पवारांनीही म्हटले.

यामध्ये दुसरे मंत्री आहेत शिंदे यांचे शिवसेनेचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट. शिरसाटांचा नोटांच्या बॅगेसोबतचा व्हिडिओ समोर आल्याने सरकारवर टीका झाली. यासह लाडकी बहिण योजनेसाठी सामाजिक न्याय खात्यातन निधी वर्ग केल्याने सरकार विरोधात त्यांनी रोष व्यक्त करत हे खातंच बंद करून टाका, असं म्हणत सरकारवरच नाराजी व्यक्त केली

यामध्ये तिसरे मंत्री आहेत शिंदे यांच्याच शिवसेनेचे गृहराज्यमंत्री योगेश कदम. कदमांच्या आईच्या नावाने असलेल्या कांदिवलीतल्या सावली बारमध्ये क्राईम ब्रांचने छापा टाकला आणि 22 बारबाला पकडल्या. मंत्र्यांच्याच कुटुंबियांच्या बारमध्ये डान्स बार सुरू असल्याच्या आरोपांमुळे योगेश कदम वादात सापडलेत. तर संजय राऊतांनी चौघांचं मंत्रीपद जाणार असल्याचा दावा केलाय.

Published on: Jul 26, 2025 10:44 AM